‘त्या’ पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार; अदर पुनावाला प्रकरणात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट

0
147

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

अदर पुनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे., असा गाैफ्यस्फोट आशिष शेलारांनी यावेळी केला.

माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही, असं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं. तसेच ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे, असा इशाराही शेलारांनी यावेळी दिला. टाईम्स या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचं नाही. लोकांची सेवा करणं भाजपने धोरण आखलं आहे. केंद्र सरकारने पुनावाला यांना सुरक्षा पुरवत आपलं काम चोख केलं असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत; वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

…त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग्रूरपणे बोलू नये- रुपाली चाकणकर

‘आयपीएल’वर कोरोनाचं सावट! KKR चे 2 खेळाडू पाॅझिटिव्ह; आजचा सामना पुढे ढकलला

“तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here