उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री- नारायण राणे

0
177

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते रविवारी सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री , असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

…आणि शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

मला खात्री आहे की एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत- पंकजा मुंडे

शिखर धवनचे नाबाद शतक, अक्षर पटेलचा झंझावात; दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here