“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा चेन्नई सुपर किंग्सवर धमाकेदार विजय”

0
159

दुबई : राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्सने चेन्नईचा 37 धावांनी पराभव केला.

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 169 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 52 चेंडूत 90 धावा केल्या. तर देवदत्त पडीक्कलने 34 चेंडूत 33 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने 14 चेंडूत 22 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दल ठाकूरने 2, तर दीपक चहर व सॅम करनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 8 गडी गमावत 132 धावापर्यंतच पोहचू शकले. चेन्नईकडून अंबाती रायडूने सर्वाधिक 40 चेंडूत 42 धावा केल्या. तर नारायण जगदीशनने 28 चेंडूत 33 धावा केल्या. तर राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून ख्रिस माॅरिस 3, वाॅशिंग्टन सुंदरने 2, तर ईशूरू उडाणा व युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”

शेवटच्या षटकात बाजी पलटली! कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय

शुभमन गिल व दिनेश कार्तिक यांची शानदार अर्धशतके; कोलकाताचे पंजाबसमोर 165 धावांचे लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here