अशा मुली बाजरीच्या शेतात मृतावस्थेत सापडतात; ‘या’ भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

0
166

लखनाै : उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून देशभरातून संताप होत आहे. यावर बाराबंकी नगरपरिषद नवाबगंजचे चेअरमन आणि भाजपचे नेते रणजीत श्रीवास्तव यांनी एक वादग्रस्त व धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

प्रेमप्रकरणातून मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल. तिला नातेवाईकांनी पकडलं असणार, कारण शेतात हेच तर होतं. ज्या मुलींचा अशाप्रकारे मृत्यू होतो त्या डाळीच्या, ऊसाच्या, मक्याच्या, बाजरीच्या किंवा नाल्यात अथवा जंगलात सापडतात. त्या धान किंवा गव्हाच्या शेतात मृतावस्थेत सापडत नाही आणि त्यांना कोणीही ओढत घेऊन जात नाही. अखेर अशा ठिकाणीच या घटना का होतात हा तपासाचा विषय आहे आणि मी चुकीचं बोललेलो नाही., असं या व्हिडिओमध्ये रणजीत श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाने या भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर केला असून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का?; योगी सरकारने काहीही दडवू नये- संजय राऊत

शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

जसप्रित बुमराची भेदक गोलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here