ही पत्रकार परिषद संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार- देवेंद्र फडणवीस

0
177

मुंबई :  आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर मी देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार आहे, अशी प्रतिक्रिया  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

काही कारणामुळे मी युतीसोबत राहू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देत आहे. त्यामुळे आमच्याकडेही बहुमत नाही. असंही ते म्हणाले.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा एकमेव कॉमन मॅक्झिम या तीन पक्षांचा प्रोग्रॅम होता. असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, शिवसेनेने बहुमत असल्याचं भासवून हसू करुन घेतलं, त्यानंतर राष्ट्रवादीही बहुमत सिद्ध करण्यात अपयशी, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here