रोहित पवारांकडून अजित पवार यांना भावनिक आवाहन

0
192

मुंबई : महाराष्ट्राला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडल्यानंतर आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.या निवडणुकंच्या काळात सतत शरद पवारांच्या आसपास दिसणारे रोहित पवार यांनी आजच्या पोस्टमधूनही भावनिक आवाहन केलं आहे.

लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते. अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत अस वाटतं. असंही ते म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here