मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, आम्ही गद्दारी नाही केली, तर…

0
210

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”

आम्ही गद्दारी नाही केली तर ‘गदर’ केला आहे. गदर म्हणजे क्रांती. आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा., असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी यावेळी दिलं.

दरम्यान, मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो, बाकी कुणीही नाही. पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत द्यायचे. मी हे ठाकरेंना सांगितले., असंही शिंदे म्हणाले. तसेच ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे, याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे,  असंही शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ही तर बाप चोरणारी औलाद; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here