“शिवसेनेत घेतले नाही म्हणून चित्रा वाघ यांचा जळफळाट”

0
793

मुंबई : सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय, असं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं होत. त्याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण, शिवसेनेने त्यांना प्रवेश नाकारला म्हणून त्या शिवसेनेवर आगपाखड करतात, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान,शिवसेनेच्या एकाही नेत्याने अद्याप बीफ खाण्याचे समर्थन केलेले नाही. बीफ खाण्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची यादी भलीमोठी आहे. ती यादी चित्रा वाघ यांनी शोधावी, असंही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चांना उधान

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं; पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

ज्यांनी ज्यांनी भाजपला सोडले, त्यांची दुर्गतीच झाली; आशिष शेलारांचा खडसेंना टोला

“आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्यांना देऊन फायदा नाही, तर…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here