मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 7 मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीच्या सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्या कोरोना उपाययोजनांचं कौतुक केलं. आपण कोरोना संकटात खूप चांगलं काम करत आहात, असं ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंना म्हणाल्या. त्यावर मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरेंनी अभिमानाने सांगितलं.
दरम्यान, आपण विरोधी पक्षांनी लढलं पाहिजे. घाबरून चालणार नाही. आपत्ती आली की आपण एकत्र येतो, चर्चा करतो. आपण आपत्तीची वाट कशाला बघायला हवी? आपण गप्प राहायचं की लढायचं हे ठरवायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यात निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत
गोड बातमी! विराट कोहलीच्या घरी नवीन पाहुण्याचं होणार आगमन; बनणार बाप
…तर आम्ही 2 तारखेला मशिदी उघडू; इम्तियाज जलीलांचा राज्य सरकारला इशारा
“नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली”