शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण भाजपच करू शकते- चंद्रकांत पाटील

0
433

मुंबई : शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण केवळ भाजपच करू शकते, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेना आणी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. आता ते मुख्यमंत्रीही झाले आणि मुलालाही मंत्री केले. मात्र, यासाठी ते मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांच्या दाढ्या कुरवाळत आहेत. त्यामुळे आता शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण केवळ भाजपच करू शकते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेचे हे बेगडी हिंदुत्व लोकांना समजावून सांगा. सरकार कुठल्या कायद्याने मुस्लिमांना आरक्षण देत आहे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विचारला.

दरम्यान, आज चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here