मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह विधीवत पूजा करून गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना केली.
तुझ्या आगमनानंतर जगावरचं कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे, तुझ्या चमत्काराची प्रचिती जगाला येऊ दे, अशी प्रार्थना उद्धव ठाकरेंनी गणरायापुढे केली. तसंच उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, गर्दी करु नका, एकमेकांपासून अंतर ठेवून राहा. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावा, सतत हात धुवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.
कोरोना संकटात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं गणपती मंडळांनी आणि नागरिकांनी ठरवलं, त्याबद्दल धन्यवाद, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला संदेश
CM Uddhav Balasaheb Thackeray’s message to the people of Maharashtra on the auspicious occasion of Ganesh Chaturthi pic.twitter.com/YSjCXBhaen
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2020
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री @AUThackeray, तेजस ठाकरे उपस्थित होते. pic.twitter.com/bKKiGi6i1x
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात 1 लाख वारकरी आंदोलन करणार”
5 वर्षांमधील कारभार सुरळीत झाला असला तरी…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा; याेग्य ती काळजी घेऊन सण साजरा करू
आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही; फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट अजित मोहन यांचं स्पष्टीकरण