रणवीर सिंहचा नविन सिनेमातील हटके लुक रिलीज

0
272

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचे एकामागोमाग एक सिनेमा रिलीज होत आहेत आणि तेही सुपरहीट होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून रणवीरच्या ‘83’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता लवकरच तो एका नवीन चित्रपटात दिसणार आहे.

‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात रणवीर दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून यात रणवीर सिंह एका गुजराती तरुणाच्या अवतारात दिसत आहे. त्याचा हा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जयेशभाई जोरदारच्या फर्स्ट लुकमध्ये रणवीर सिंह ऑरेंज कलरच्या टिशर्ट आणि फेडेड पॅन्टमध्ये स्मार्ट दिसत आहे. याशिवाय या पोस्टरमध्ये रणवीरच्या मागे खूप साऱ्या बायका डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत पदर घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on Dec 3, 2019 at 9:30pm PST

जयेशभाई एक सामान्य व्यक्ती जो एका प्रतिकूल परिस्थितीत काहीतरी वेगळं काम करत असताना संपून जातो. तो संवेदनशील आणि दयाळू आहे. तो पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही पुरुष आणि महिलांना समान अधिकार मिळावेत यावर विश्वास ठेवणारा असल्याचं जयेशभाई जोरदार’मधील भूमिकेबद्दल बोलताना रणवीरने सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना फटका; रिचार्ज दर वाढणार!

देवेंद्र फडणवीसांना ‘मी’ पणाचा दर्प नडला- शरद पवार

अजित पवार भाजप मध्ये जाण्याचं ‘हे’ होतं कारण.. शरद पवारांनी केला…

“बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here