भाजपने आमचा विश्वासघात केला या मतावर मी आजही ठाम- महादेव जानकर

0
611

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : ‘भाजपाने आमचा विश्वासघातच केला आहे, या मतावर मी आजही ठाम आहे, असं विधान रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं.

हे ही वाचा : धनंजय मुंडेंनी मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलंय; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा तसेच पदाधिकारी आढावा बैठक काल अहमदनगर येथे झाली. याचं उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपा पक्ष जिंतुर आणि दौंडची जागा आम्हाला देणार होते. मात्र, त्यांनी ती जागा आम्हाला दिली नाही. याचा जाब भाजपाच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे. या मतावर मी आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे., असा दावा जानकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी उभा राहणार- महादेव जानकर

महापालिकेवर सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शरद पवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर

“आजच्या दिवशी तरी शुभ बोललं पाहिजे, अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here