“महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनंच न्यायालयात दिलं”

0
317

मुंबई : देशात ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल केंद्र सरकारने काल संसदेत सादर केला. यानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच न्यायालयात दिले आहे. त्यामुळे आघाडी सरकारचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री व आघाडी सरकारमधील काही मंत्री याआधी केंद्र सरकार ऑक्सीजनचा पुरेसा पुरवठा करत नसल्याचे आरोप करत होते. आता न्यायालयात दिलेल्या शपथपत्रामुळे या सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली आहे, असंही उपाध्ये यांनी नमूद केलं.

महत्वाच्या घडामोडी –

राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा- नारायण राणे

मला आता फोन कर, मी तुमच्यासाठी कपडे काढेन; अभिनेत्री पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“चिपळूणमध्ये पूर परिस्थिती आवाक्याबाहेर, सरकारने तातडीने लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here