उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून महाराष्ट्रात दुसरं सरकार…; निपाणीच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका

0
216

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

निपाणी : कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे सरकारमधले लोक फोडून दुसरं सरकार महाराष्ट्रात आणलं गेलं. अशी अनेक राज्यं सांगता येतील ज्या ठिकाणी धनाचा वापर करुन, बळाचा वापर करून माणसं फोडली गेली आणि त्यातून सरकार स्थापण्यात आली. ही भूमिका घेतली गेली आहे., असं शरद पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी; भाजप संपर्कातील ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

दरम्यान, याला कर्नाटकही अपवाद नाही. या देशात पैशांचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करण्याची वेळ आज आली आहे, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी; भाजप संपर्कातील ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here