“पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर..”; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

0
1858

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटांवर संजय राऊतांनी सडेतोड उत्तरं दिली. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, हे रहस्य फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज यासंदर्भाने मोठं वक्तव्य केलंय.

हे ही वाचा : शरद पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

तो शपथविधी जर शरद पवार यांना विचारून झाला असता तर सरकार पडलं नसतं, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते शरद पवार आहेत. त्यांना विचारून शपथविधी झाला असता तर ते सरकार पडलं नसतं. माझं पक्कं मत आहे की, ते पवार यांना विचारून झालं नाही. काही तरी वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता वाद करण्याचं काम सुरू आहे. ते फडणवीस करत आहेत. हा दिशाभूल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं थोरात म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”

“लगान चित्रपटातील ‘हा’ अभिनेता काळाच्या पडद्याआड”

“ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here