“बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही “

0
144

मुंबई : राज्य सरकारने मनसेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे  नेते आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

आम्ही जबाबरीने योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून मनसे नेत्यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तरीही मनसे कार्यक्रम घेण्यावर आग्रही आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर बसू शकला असता का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

“संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही, पण…”

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here