‘हा’ मराठी अभिनेता म्हणतो… राज ठाकरे हे ‘जाणता राजा’

0
465

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज भव्य महाअधिवेशनाच आयोजन केलं. यावेळी मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांनी भाषण केले. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक करत त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला.

राज ठाकरे यांचे नाव राज असल्याने त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला असं संजय नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

या महाअधिवेशनाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरेंचं जोरदार लाँचिंग केलं.

दरम्यान, मनसेकडून आज संजय नार्वेकर यांनी ठराव मांडले. यात सिने आणि नाटक क्षेत्राशी संबंधित ठरावही होते.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेच्या झेंड्याचे स्वरुप स्पष्ट; आता राज ठाकरेही म्हणतात ‘हे भगवा रंग’

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते त्यांचे खांदे निखळले- उद्धव ठाकरे

सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाहीत- पंकजा मुंडे

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठ निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here