खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विसरलात; शिंदे गटाचा हल्लाबोल

0
148

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या वक्तव्या नंतर राहुल गांधींवर देशभरातून टीका होत आहे. तर, महाराष्ट्रात भाजपा- शिंदे गटच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत.

आज ठाण्यात गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा माजी महापौर नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

“मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अनुद्गार काढले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: रस्त्यावर उतरत मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोड्यांनी हाणलं. राहुल गांधी सावरकरांचा माफीवीर उल्लेख करून, त्यांची निंदा नालस्ती करतात. पण, बाळासाहेबांचे वारसदार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत त्यांच्याबरोबर आघाडी करतात,”असं नरेश मस्के म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “महाविकास आघाडीच्या सभेआधीच ठाकरे गट-शिंदे गटाचे ‘हे’ नेते एकत्र, चर्चांना उधाण”

केवळ एका भाषणात राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणत असाल, तर रस्त्यावर उतरत राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे हाणा… त्यांचा निषेध करा. तुम्ही प्रत्येकवेळी बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहे, असं सांगता. मग बाळासाहेबांचे विचार कृतीत आणा… खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विरसलं आहात,” असंही नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. त्यानंतर 25 मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; भेटीत ‘या’ विषयांवर झाली चर्चा

मार्क वूडपुढे दिल्लीचे लोटांगण; लखनाैचा दिल्लीवर 50 धावांनी दणदणीत विजय

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here