Home महाराष्ट्र “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा...

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमान प्रकरणी नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. त्यामुळे राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

अलिबाग न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राणेंचा जामीन मंजूर केला होता.

हे ही वाचा : तब्बल 10 महिन्यांनी तूरूंगाबाहेर येताच, नवज्योत सिंग सिद्धूंचं, राहूल गांधींबद्दल मोठं विधान, म्हणाले…

दरम्यान, या प्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. राणे यांचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे यांनी जोरदार युक्तिवाद करताना राणे यांच्यावर शिक्षा करण्याइतका गंभीर गुन्हा नसल्याने म्हटले होते. तसेच पुरेसा पुरावा दोषारोप पत्रात दिसत नसल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता. त्यामुळे राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त करावे, अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार राणे यांना दोषमुक्त करण्यात आले.

महत्त्वाच्या घडामोडी –

संभाजीनगर आणि मालवणी दंगलप्रकरणावर आता शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

“शिंदेंकडे गेलेले अनेक आमदार, उद्धव ठाकरेंकडे लवकरच परत येणार”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश