“आई-बाबा घरी नाहीत तू ये…; प्रेयसीनं बोलवताच प्रियकर गेला आणि त्याच्यासोबत जे घडलं ते…”

0
292

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक घटना घडली आहे. घरी कोणी नसताना आपल्या प्रेयसीला भेटायला जाणं, हे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

अशातच या तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला चोर समजून चांगलाच चोप दिला. यात हा प्रियकर गंभीर जखमी झाला असून त्याला लगेजच जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा  : गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रियकर डीजे वाजवण्याचं काम करतो. रात्री डीजे वाजवून तो घरी परत येत होता. अशातच प्रेयसीने घड्याळ देण्यासाठी फोन करून त्याला बोलावून घेतलं. ती म्हणाली की, आई-वडील घरी नाहीत. तू ये आणि गिफ्ट दिलेलं घड्याळ घेऊन जा. तो प्रेयसीच्या घरी पोहचला. त्यानंतर तो दरवाजा उघडून आत जाऊ लागला. अशातच मुलीच्या वडिलांनी व भावानं त्याला पाहिलं, आणि चोर समजून त्या प्रियकराला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूचे लोकही जमा झाले. अखेर लोकांना हे समजावून प्रकरण शांत झालं. त्यानंतर या तरूणाने सत्य काय आहे ते सर्वांना सांगितलं. यानंतर लोकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग; धैर्यशील मानेंना टक्कर देण्यासाठी ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

Election Result! “मोदींना मोठा धक्का; ‘या’ राज्यात काँग्रेस आघाडीवर”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज ठाकरेंनी सांगितला उपाय, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here