Home महाराष्ट्र बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार; अयोध्येतील सोहळ्याआधी ओवेसींचं ट्विट

बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार; अयोध्येतील सोहळ्याआधी ओवेसींचं ट्विट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे.

“बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह”, असं ट्विट करत ओवेसींनी या ट्विटमध्ये बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे.

दरम्यान,कालच ओवेसींनी बाबरी मशीद प्रकरणावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सुनावलं होतं. त्यानंतर आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ओवेसींनी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो ट्विट केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

आज बाळासाहेब हवे होते; राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर; डोनाल्ड ट्रम्प यांचा चिनी कंपनीला इशारा

सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांचं आणखी एक ट्विट; म्हणाल्या…

सुशांतसिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन; म्हणाले…