आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो, आणि रात्री त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करतो; ‘या’ अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

0
657

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगणा रणाैतच्या वादग्रस्त विधानानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अभिनेता आणि कॉमेडीयन वीर दास याने अमेरीकेतील एका शोमध्ये वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा : “संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण”

मी अशा भारतात राहतो. जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पुजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो’, असं विधान वीर दासनं अमेरिकेतील शोमध्ये बोलताना केलं होतं. वीर दासच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर देशभरातून टीका होत आहे. यानंतर भाजपचे कायदा सल्लागार अॅड.आशुतोष दुबे यांनी त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, वीर दासने त्याच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंटनंतर खुलासा केला होता. मी यु-ट्युबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारताच्या दोन वेगवेगळ्या बाजू दाखवल्या आहेत. त्यामध्ये अपमान करण्याचा हेतू नसून आपण सगळेच भारत देशावर प्रेम करतो. त्यामुळे कोणत्याही एडीट केलेल्या व्हिडीओवर विश्वास ठेवू नका, असं वीर दासनं ट्विट करत सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; गोंदियाच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश”

…तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असतं; शिवसेनेचा घणाघात

“राष्ट्रवादीचे मिशन दिल्ली; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here