हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनंं पुन्हा डिवचलं; शिवसेना भवनसमोर केली बॅनरबाजी

0
495

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. शिवसेना भवनसमोर बॅनर लावत मनसेनं शिवसेनेवर मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन टीका केलीय.

नसेनं लावलेल्या बॅनरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. मनसेची शिवसेनेविरोधात ही काही पहिली बॅनरबाजी नाही. यापूर्वी देखील मनसेनं शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी करुन शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

हे ही वाचा : “मशिदीवरील भोंग्याच्या आदेशावरून मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे नाराज”

माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राजसाहेब ठाकरे चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या. सेनेचं हिंदुत्व हे केव्हाच संपलं आहे बाळासाहेब गेल्यावर हिंदुत्व निघून गेलं. आता सेनेचा रंग हिरवा झाला आहे,’ अशी टीका मनसेच्या बॅनरमध्ये करुन शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मशिदीवरील भोंग्याच्या आदेशावरून मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे नाराज”

“ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत, नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास एकत्र; चर्चांना उधाण”

भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here