“बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या”

0
271

मुंबई : बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांचं निधन झालं. आसिफ बसरा यांनी त्यांच्या हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा याठिकाणी असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आसिफ बसरा यांच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

आसिफ यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी आणि तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक विमुक्त रंजन यांनी दिली आहे.

दरम्यान, आसिफ यांनी पाताल लोक, हॉस्टेजस या वेब सिरीजमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे ताशकंट फाईल्स, वन्स अपॉन टाईम इन मुंबई या चित्रपटात देखील काम केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही”

‘शवसेनेने’ आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये; अमृता फडणवीसांचा टोला

वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी- निर्मला सीतारमण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here