मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान फडणवीस-शाह यांच्यातील भेटीविषयी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामागे काय कारण असू शकते, अशी विचारणा केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील साखर उद्योजकांचे प्रश्न घेऊन अमित शाह यांना भेटले. ते पूर्ण देशातील साखर कारखानदारांबद्दल चिंता व्यक्त करत असतील.
दरम्यान, त्यावर राऊत यांनी केंद्रीय गृहखात्याकडे साखर कारखानदारांचे काय प्रश्न असू शकतात, अशी शंका उपस्थित केली. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एक मिष्किल टिप्पणी केली. ‘गृहा’मध्ये शेवटी साखर लागतेच. फडणवीसांना गृहमंत्री म्हणजे त्यांना कदाचित जसे आदेश बांदेकर करतात कार्यक्रम, तसे गृहमंत्री वाटले असतील. म्हणूनच ते साखरेचा प्रश्न घेऊन अमित शाह यांच्याकडे गेले असतील, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
…अन् जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्रांनी सहकाऱ्यांसह पॉईंटवर तिरंगा फडकावला
धक्कादायक! सांगलीत पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन
“माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता”
आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन मुंबईत बसून नियंत्रण ठेवत आहेत- शरद पवार