शिवाजीनगर परिसरात टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम; रविंद्र साळेगावकर यांच्या उपक्रमाचे रहिवाशांकडून कौतुक

0
165

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे शहर सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांच्या पुढाकाराने मागील चार महिन्यांपासून ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास १४० सोसायट्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

स्वच्छतेदरम्यान टाक्यांमधील कचरा, पालापाचोळा, दगड, माती, शेवाळे काढून संपूर्ण टाकी स्वच्छ केली जाते. त्यानंतर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते. मोफत सुरू असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

राजेश बंगला, नकुल अपार्टमेंट, वीर नेताजी सोसायटी, दख्खन पाटबंधारे गृह रचना सोसायटी, अशोक सोसायटी, चंद्रलोक अपार्टमेंट यांसह परिसरातील अनेक सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि बंगल्यांतील टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

पीएमसी कॉलनी, पांडवनगर येथील मयूर शेंडगे म्हणाले, “आमच्या येथील दहा इमारतींच्या पाण्याच्या टाक्या साळेगावकर यांच्या वतीने स्वच्छ करण्यात आल्या. लोकहिताची कामे त्यांच्याकडून नेहमीच केली जातात.”

पीएमसी कॉलनी येथे या स्वच्छता मोहिमेच्या दूसऱ्या टप्प्यातील भूमिपूजन समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार शिरोळे म्हणाले, “स्वच्छ पाणी आणि निरोगी आरोग्य या उद्दिष्टाने राबविण्यात येणारी ही मोफत स्वच्छता मोहीम नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल आणि हा जनकल्याणकारी उपक्रम आहे.”

आयोजक साळेगावकर म्हणाले, “पावसाळ्यात अनेक टाक्या अस्वच्छ होतात. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. दिवसेंदिवस सोसायट्यांचा सहभाग वाढत आहे.”

भूमिपूजनप्रसंगी हेमंत डाबी, किरण ओरसे, सुजीत गोटेकर, पाटोळे, रविराज यादव, अपर्णा कुऱ्हाडे, लता धायगुडे, सीमा उत्तेकर, दत्ता घोगल्लू, ईश्वर बनपट्टे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

स्मृती मंधाना–पलाश प्रकरणावर सोशल मीडियात खळबळ! लग्नाच्या पूर्वसंध्येला ‘चिटिंग’चे दावे;

भारताकडे तिसरा वर्ल्डकप.. क्रिकेटनंतर आता कब्बडीतही मुलींची बाजी!

स्मृतीच्या वडिलांनंतर तिचा होणारा पती पलाशचीही तब्येत बिघडली; सांगलीत तातडीने दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here