…तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ- सुधीर मुनगंटीवार

0
1666

मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंहा काढला तरी आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचं कारण नाही. समजा उद्या यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढला तरी या मुद्दयासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये असलेल्या युतीला विचारसरणीचा आधार होता. त्यामुळे त्यांनी दबाव आणला आणि पाठिंबा काढला तरी आम्ही पाठिंबा देऊ, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी आहेत; रामदास आठवलेंच वक्तव्य

मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करेन; त्यांनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन

रश्मी वहिनींकडून मला अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर अन्याय केला आहे- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here