मुंबई : राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. शरद पवारांच्या या विधानानंतर अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी देखील पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता??? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCP ला त्रास होण्यासारखं काय??? , असा सवाल करत निलेश राणेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता??? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCP ला त्रास होण्यासारखं काय??? https://t.co/0vgJLbosn7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 20, 2020
दरम्यान, आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले होते.
महत्वाच्या घडामोडी-
राजू शेट्टी यांचं दूध दराचे आंदोलन म्हणजे…; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर निशाणा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; म्हणाले…
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन- जयंत पाटील
उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का?; संजय राऊत म्हणतात…