माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत

0
245

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आयपीएल 16 व्या हंगामाला सुरूवात झाली असून, चेन्नईच्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ही यंदाची अखेरची स्पर्धा असल्याची चर्चा होत आहे. अशातच आता धोनीने यावर आपल्या खास शैलीत उत्तर देत 2024 मध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आयपीएलचा आजचा सामना इकाना स्टेडिअमवर चेन्नई आणि लखनौ यांच्यात खेळला गेला. मात्र पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. आजच्या सामन्याआधी नाणेफेकीनंतर डॅनी माॅरिसन यांनी धोनीला निवृत्तीबाबत विचारणा केली असता, धोनीनं आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

ही बातमी पण वाचा : “धक्कादायक! ना अजित दादा, ना सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ‘हे’ नाव आलं समोर”

नामेफेकीनंतर धोनीला डॅनी माॅरिसन याने विचारले की, आयपीएलचा अखेरचा हंगाम एन्जॉय करतोय का? यावेळी धोनीने हसत आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा असेल.. हे तुम्ही ठरवलेय.. मी नाही.. यावर डॅनी माॅरिसन याने धोनी पुढच्यावर्षीही कमबॅक करेल असे म्हटले. त्यावर धोनीने हसत हसत मैदान सोडलं. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने हा व्हिडीओ पोस्ट करत धोनीच्या उत्तराचे कौतुक केलं आहे. धोनीने पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांच्या राजीनाम्यावर सुषमा अंधारेंचं, पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…

राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सूरू, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गाैफ्यस्फोट

“शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं हे…”; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here