काँग्रेसमध्ये इन्कमिंगला सुरुवात; ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
411

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

वेंगुर्ले : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पक्षवाढीसाठी आपली कंबर कसली असून  काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षवाढीसाठी कामाला असून नाना पटोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचे सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर वरक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर दुसरीकडे मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय कदम यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार विकास ठाकरे, माजी आमदार हुसेनबानू खलिफा, प्रवक्ते राजू वाघमारे, युवा नेते विशाल मुत्तेमवार, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, नवीनचंद्र बांदिवडेकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, ज्येष्ठ पदाधिकारी दादा परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ

खानापूरमध्ये पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास

कंगना रनौतला मिळणार भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी?

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं; फडणवीस म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here