“शरद पवारांवर खरंच प्रेम असेल, तर जास्तीत जास्त नगरपालिकेत राष्ट्रवादीचे झेंडे फडकवा”

0
740

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून परभणीतून सुरुवात झाली.

काल परभणी शहर येथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत जयंत पाटील यांनी पवारांवर खरेच प्रेम असेल तर जास्तीत जास्त नगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं.

येत्या काळात पुर्ण ताकदीने आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. यासाठी अधिक संघटीत होणे गरजेचे असून परभणी जिल्ह्यात आपला आमदार आणि खासदार नाही. ही परिस्थिती पुढील निवडणुकीत आपल्याला बदलायची आहे. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर एकसंध राहणे गरजेचे आहे. तुम्हाला पक्षावर, पवार साहेबांवर प्रेम असेल तर पक्ष वाढविण्यासाठी रक्ताचं पाणी केल्याशिवाय गत्यंतर नाही., असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, पक्षाचा गाभा मजबूत करणे गरजेचे आहे, त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्ताला तयार करा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असं आवाहन जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं.

महत्वाच्या घडामोडी –

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पाॅईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो- नितीन गडकरी

“राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडविल्या जातायेत, पण मुख्यमंत्र्यांना काळजी आहे ती फक्त सरकार 5 वर्षे टिकण्याची”

“…याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानायला हरकत नाही”

“भाजपला 3 वर्षात देशातून हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here