चंद्रकांत पाटील म्हणजे अफवा पसरविणारे नेते, हवेत गोळीबार करू नका; संजय राऊतांचा टोला

0
474

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

दोन्ही काँग्रेसने आपल्या वाट्याला अत्यंत महत्त्वाची खाती घेवून आपले पारंपरिक कारभार सुरू ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्ता सोडून जाणार नाही, असे माझा मित्र असलेल्या कॅबिनेट मंत्र्यानेच मला सांगितले आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी सांगितली होती. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणजे अफवा पसरवणारे नेते आहेत. त्यांना काही काम नसतं, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री, त्यांचं नाव सांगावं, असं आवाहनही संजय राऊतांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, त्यांना शुभेच्छा- किरीट सोमय्या

शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं; बाळासाहेब थोरातांचं आवाहन

कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोणत्याही निर्णयावर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास; मनसेचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here