महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

0
281

नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीतून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याची चर्चा आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीसोबत जाऊन काशी झाली म्हणून त्यांनी आता आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर यावेळी केला.

राजू शेट्टींचा आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की, त्यांचा भ्रमनिराश तेंव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिराश झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय, असा टोला सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

राजू शेट्टी आमदार होणार की नाही; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार असतं; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आणखी एक जलवा! बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतनं पटकावलं सुवर्णपदक”

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं- चंद्रशेखर बावनकुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here