मराठा आरक्षणाबाबत विरोधकांवर बोलताना शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली, म्हणाले…

0
291

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. यानंतर आता शिंदे गटाकडून हिंदुत्वगर्जना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

उस्नाबादमधील या हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून बोलताना सावंत यांची जीभ घसरली. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य सावंत यांनी यावेळी केलं.

हे ही वाचा : “पाकिस्तान जिंदाबादच्या विरोधात पुण्यात मनसेचं खळखट्याक आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला”

दरम्यान, यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असंही सावंत म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारा- आशिष शेलार

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here