“पंकजा मुंडेंची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, त्यामुळे…”

0
491

पुणे : पंकजा मुंडे यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री सामाजिक समाजकल्याण मंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य भाजपमध्ये गेलं आणि पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करू नये, अंस  रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्री मंडळात नेत्यांना स्थान गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“देशमुखांची आज ईडीने 4 कोटीची संपत्ती जप्त केली, हळू हळू 100 कोटींची मालमत्ता जप्त होणार”

संजय राठोड आमचे दुश्मन नाही, शिवसेना तर बिलकुल नाही- चंद्रकांत पाटील

“ईडीची मोठी कारवाई! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त”

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठी गंभीर बाब; नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली काळजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here