“तात्या विंचूला जीवनदान देणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड”

0
462

मुंबई : झपाटलेला चित्रपटात बाबा चमत्कार ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

झपाटलेला या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटात त्यांच्याबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.

राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केलंय.

दरम्यान, बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

महत्वाच्या घडामोडी-

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली- निलेश राणे

“नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा”

“शर्जिलला बेड्या पडतीलच! निश्चिंत रहा, हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here