पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली असून चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले आहेत.
मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (4 जुलै) सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, थोडासा ताप आल्याने मी माझी #COVID-19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असं ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवार यांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं- देवेंद्र फडणवीस
“तीन पक्षाचं सरकार… सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश