Home महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा करोना विषाणूची सौम्य लक्षण होती. मात्र, त्यांनानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

दत्ता साने 25 जून रोजी करोना विषाणुची बाधा झाल्याचं स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दत्ता साने यांनी करोना विषाणुच्या संकट काळात अनेक नागरिकांना मदत केली होती. अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना त्यांनी धान्य वाटप केले होते.

महत्वाच्या घडामोडी-

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला- नारायण राणे

भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार ‘ही’ मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडे समर्थकांसाठी गुडन्यूज!