Home पुणे ‘राजकारणातली नवी आणीबाणी; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

‘राजकारणातली नवी आणीबाणी; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

पुणे : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांच्या नियुक्तीला होणाऱ्या दिरंगाईवरुन राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात राज्यपालांना लक्ष्य केलं. तसेच ही परिस्थिती राजकारणातील नवी आणीबाणी असल्याचा आरोप केला.

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या जागांचे राजकारण आताच सुरु झाले आहे. सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असं विरोधी पक्षाला वाटत आहे.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांत या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे 12 सदस्य कोण व त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय ? हाच प्रश्न आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”

शरद पवार यांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं- देवेंद्र फडणवीस

“तीन पक्षाचं सरकार… सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन