दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…

0
236

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये (एनसीबी) आज महत्वाच्या घडामोडी होणार आहेत. कारण अभिनेता सुशांत सिंह मृत्यूचा तपास सुरू असताना बाॅलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. यामध्ये बाॅलिवूडच्या स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची नावे समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांना समन देऊन हजर राहण्यास सांगितले आहे.

दीपिका पादुकोण चाैकशीसाठी कार्यालयात दाखल झाली असून एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.

2017 चे ते व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केलं आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असं दीपिकाने म्हटल्याचंही समोर येत आहे.

दरम्यान, एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पादुकोणची कसून चौकशी सुरू आहे. दीपिका पादुकोण प्रश्नांची उत्तर योग्य पद्धतीने देत नाही, अशी माहिती समोर येत आहे. तसेच अनेक प्रश्नांवर दीपिका गोलमाल उत्तरे देत आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे- संजय राऊत

“अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल”

“अभिनेत्री दीपिका पादुकोणपाठोपाठ आता श्रद्धा कपूरही चाैकशीसीठी एनसीबी कार्यालयात दाखल”

आजपासून केईएम रूग्णालयात कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरूवात; 3 जणांवर टेस्ट करणार ही लस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here