“मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”

0
430

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजपमध्ये एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सूरू असतानाच. आज मात्र शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रेल्वेतून एकत्र प्रवास केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

या दोघांच्या एकत्रित प्रवासाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवासात दोघांनी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : “राज ठाकरेंवरील टीकेनंतर, आता मनसे नेत्याच्या जितेंद्र आव्हाडांना इशारा, म्हणाले, मनसैनिकांचा संयम सुटला तर तुमचं…”

जळगाव दौऱ्यावर येत असताना शरद पवार आणि गुलाबराव पाटील हे रेल्वेतून सोबत प्रवास करत असताना समोर आले आहे. शरद पवार हे 16 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अंमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाचा एक दिवसीय शिबिरास ते मार्गदर्शन देखील करणार आहे. दरम्यान मुंबईतून शरद पवार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सोबत प्रवास करत आहेत.  मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यायचं असेल तर…; भाजपच्या मोठ्या नेत्याची खुली ऑफर

BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे, माझं करिअर बर्बाद झालं; टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा गंभीर आरोप

भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी; ‘या’ भाजप नेत्याची मुख्यंत्र्यांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here