मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी बोलताना हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन 30 जूनला संपत आहे. त्यापुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नाही. मात्र, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आजपासून राज्यभरातील सलून दुकानंही सुरु करण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र, याचा अर्थ संकट टळलं असा नाही. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
चंद्रकांत पाटील यांचं चंपा नाव कुणी ठेवलंय?; अनिल गोटेंनी सांगितलं ‘त्यांचं’ नाव
“देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे”
“संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला”
लायकी पाहून बोलावं; सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते- अजित पवार