Home महाराष्ट्र …अन्यथा राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

…अन्यथा राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.  सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना वारंवार सांगूनही लोक आवश्यक ती काळजी घेत नसतील, नियमांचे जर गांभीर्याने पालन झाले नाही तर पुन्हा पूर्वीसारख्या लॉकडाउन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई-पुण्यात, शहरात किंवा ग्रामीण भागात काही ठिकाणी लोक आता लॉकडाउनवैगरे सगळं संपलं असं वागत आहेत. पण हे काहीही संपलेलं नाही. भाजीवाले ठिकठिकाणी बसत आहेत तिथे गर्दी होत असून लोकांच्या तोंडावर मास्कही लावलेलं दिसतं नाही. त्यामुळे आपणहून कोविडला बळी पडू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काही प्राथमिक गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. म्हणजेच बाहेर फिरताना तोंडावर मास्क लावणे, एकमेकांपासून अंतर ठेवणं हे गरजेचं आहे. मॉर्निंग वॉकला, सकाळच्या व्यायामाला आपण परवानगी दिली आहे. ती आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून दिलेली आहे, आजाराला बळी पडण्यासाठी नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

30 जूननंतर लॉकडाउन उठणार का; उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

चंद्रकांत पाटील यांचं चंपा नाव कुणी ठेवलंय?; अनिल गोटेंनी सांगितलं ‘त्यांचं’ नाव

“देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे”

“संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला”