राज्यात 28 दिवसांचा लाॅकडाऊन करा; माजी खासदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

0
181

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

पत्र खालीलप्रमाणे

मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री म.रा.
मंत्रालय, मुंबई

विषय:- 28 दिवसाचा लॉकडाऊन लावण्याबाबत…

महोदय,

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लॉक डाऊन, मिनी लॉकडाउन, वेगवेगळी बंधने लावली जात आहेत. सर्व जिल्ह्यात एक सारखी परिस्थिती नाही, ही संपूर्णतः गोंधळाची स्थिती आहे. राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहे, आणि दिवसागणिक हा आकडा वाढत चालला आहे. कदाचित एक महिन्यानंतर हे अनकंट्रोल होईल. यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे फेल झालेली दिसेल. अशा परिस्थितीमध्ये, राज्याची नाहक बदनामी होईल, आणि जनतेच्या स्वार्थासाठी सुद्धा हे हानिकारक राहील. माझी आपणास विनंती आहे, कुणाचीही तमा न बाळगता, कडक धोरण स्वीकारावे लागेन, कोरोनाची साखळी तोडावी लागेन, तरच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो. असा माझा ठाम विश्वास आहे.

28 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करावा, हे जाहीर करतांना 5 दिवस आधी तो जाहीर करावा, सर्व पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, अत्यावश्यक सेवा यांना सतर्क ठेवावे. या काळामध्ये चीट पाखरूही बाहेर दिसू नये, असे कडक धोरण अवलंबविण्यात यावे.

लॉगडाऊन ची घोषणा करतांना काही गटांना आर्थिक मदतीची घोषणा व्हावी, उदा. शेतमजूर, इमारत बांधकाम मजूर , ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर,घरेलू कामगार आणि बारा बलुतेदार यांच्यासाठी प्रत्येक कमीत कमी 5 हजार रु.ची घोषणा करावी.

धन्यवाद..

आपला
हरिभाऊ राठोड
माजी वि.प.स.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण”

पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव; बेंगलोरने दिली दमदार विजयी सलामी

“…तर लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल”

मनोहर भिडेंवर कारवाई करणार?; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here