पुणे : राज्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला जाणार हे निश्चित झालं आहे.
संत तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबर 20 वारकरी असणार आहेत. येत्या 30 जूनला म्हणजेच दशमीला दोन्ही पादुका पंढरपूरकडे पाठवल्या जाणार आहेत. या दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. ती चाचणी झाल्यानंतर त्यांना या सोहळ्यात सहभाग घेता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. या दोन्ही पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर सरकारच्या निर्णयाप्रमाणे दोन्ही पालख्यांच्या पादुका पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, सकाळी सहा वाजता सजवलेल्या एस. टी. बसमधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी मार्गाने पंढरपूरला जातील. या दोन्ही पालख्या आपल्या पारंपारिक मार्गावरून परंपरेप्रमाणे दुपारी चारच्या सुमाराला पादुका वाखरीला पोहचणार आहेत. त्या ठिकाणी संतभेट होऊन पादुका पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
लायकी पाहून बोलावं; सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते- अजित पवार
भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला
देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करतात- शरद पवार
“पवारांचे वय, राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”