नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

0
278

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यात ते बोलत होते.

देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना त्यांनी काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपल्या सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

हे सरकार दारुडं सरकार आहे; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…; सदाभाऊ खोतांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

“निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात”

पेट्रोलचे भाव ठाकरे सरकारमुळे वाढले, कर कमी केल्यास पेट्रोल 75 रुपयांना होईल- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here