“अपघातांच्या मालिका सूरूच; आमदार बच्चू कडूंचा अपघात, उपचारासाठी रूग्णालयात दाखल”

0
285

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : राजकीय वर्तुळात अपघाताची मालिका सुरुच आहे. अशातच आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांचा देखील अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

रस्ता ओलांडत असताना आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : “शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ महिला नेत्यानं केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अपघाताची मालिका सूरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते जयकुमार गोरे, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. आता अशातच बच्चू कडूंचा अपघात झाला असून राजकीय वर्तुळात अपघातांच्या मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ महिला नेत्यानं केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश”

“मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शरद पवारांनी केला एकाच गाडीतून एकत्र प्रवास, राजकीय चर्चांना उधाण”

“नाराजींच्या चर्चानंतर आता स्वत: वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीस, पुण्यातील निवासस्थानी मोरे-ठाकरेंमध्ये खलबतं, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here