“जयंत पाटील पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

0
528

सांगली : मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर भाजप नेते आमदार आणि गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही पडळकरांनी यावेळी लगावला.

दरम्यान, लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर राजकारणात आलेले अनुकंपा निकषावर राजकारणात जयंत पाटील आले आहेत. त्यांच्याकडे पात्रता नसताना ते राजकारणात आले आहेत, असं म्हणत पडळकरांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष- अब्दुल सत्तार

रेणू शर्मांवर राजकीय दबाव, काही लोकांनी तक्रार करायला लावली; अनिल देशमुखांचा गाैफ्यस्फोट

बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टी सुरक्षित होती- उर्मिला मातोंडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here