पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ, पण…; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया

0
776

पुणे :  मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पदाची आशा बाळगणे हे प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे काम असते. परंतू पाटील कोणत्या सालाबद्दल बोलले आहेत हे त्यांना विचारावं लागेल, असं नीलम गोऱ्हे म्हणावल्या.

दरम्यान, ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नीलम गोऱ्हे बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी-

जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही, कारण…- सुधीर मुनगंटीवार

भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या मंत्र्याचं वक्तव्य

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय; यावर अजित पवार म्हणाले…

“शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, पण…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here